‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत नवा ट्विस्ट, ओम- स्वीटूच्या लग्नात मालविकाचं नवं कारस्थान!

या दोघांच्या लग्नात मालविकाने नवं षडयंत्र रचलं आहे. लग्नाच्या शूभ मुहूर्तावर मालविका नवीन चाल खेळणार आहे. लग्नात एका मोठ्या संकटाला स्वीटूला सामोरं जावं लागणार आहे.

  झी मराठीवरील मालिका येऊ कशी तशी मी नांदायला वेगळ्या वळणावर पोहचली आहे. अखेर चाहत्यांच्या मनातली इच्छा पुर्ण झाली आहे. अखेर ओम आणि स्वीटूचं लग्न होणार आहे. अखेर स्वीटूच्या आईने या लग्नाला होकार दिल्यामुळेच ओम आणि स्वीटूच लग्न होत आहे. मात्र आजही मालविकाला स्वीटू आपल्या घरात सून म्हणून नकोय. त्यामुळे ती या दोघांच्या लग्नात काहीना काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करतेच. ती आता ओम आणि स्वीटूच्या पुन्हा एक अडथळे आणत आहे.

  View this post on Instagram

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  या दोघांच्या लग्नात मालविकाने नवं षडयंत्र रचलं आहे. लग्नाच्या शूभ मुहूर्तावर मालविका नवीन चाल खेळणार आहे. लग्नात एका मोठ्या संकटाला स्वीटूला सामोरं जावं लागणार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  सध्या या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खानविलकर आणि साळवी कुटुंबाने हळदी समारंभ, साखरपुडा सगळं काही उरकलं आहे. पण ऐन लग्नाच्या मुहूर्ताला ओम मात्र गायब होताना प्रोमोत दिसत आहे. तेव्हा आता लग्नाच्या मुहूर्ताला ओम न आल्याने तसेच स्वीटू समोर नवी व्यक्ती उभी राहिली आहे. त्यामुळे स्वीटूच लग्न इतर कोणाशी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.