Zee TV changed the mother-in-law relationship with Hamari Wali Good News
‘हमारीवाली गुड न्यूज’द्वारे ‘झी टीव्ही’ (Zee Tv) ने बदलले सासू-सुनेचे नाते!

मुंबई: ऑक्टोबरच्या उत्सवी महिन्यात आपल्या प्रेक्षकांसाठी ‘झी टीव्ही’ (Zee Tv) जो नव्या मालिका आणि कार्यक्रमांचा धमाका करणार आहे, त्यात भारतीय समाजात सतत बदलणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याचीही एक हृदयस्पर्शी कथा आहे. आतापर्यंत भारतीय टीव्हीवर (Indian Television) सासूला नेहमीच सुनेची शत्रू आणि सुनेवर वर्चस्व गाजविणार्‍या स्त्रीच्या रूपात दाखविले गेले आहे. पण आता ‘हमारीवाली गुड न्यूज’ (Hamari Wali Good News) या नव्या मालिकेत सासू-सुनेचे नाते हे विश्वास, आशा आणि मैत्रीवर आधारित असलेले दाखविण्यात आले आहे. यातील सासू आणि सून एकमेकींना नेहमी मदत करताना दिसतात. किंबहुना या नव्या मालिकेतील(new serial) सून (daughter in law) नाव्या ही आपल्या कुटुंबियांना ‘चांगली बातमी’ (Good News) देण्यासाठी चक्क आपल्या सासूबाई रेणुकाबाई यांच्याशी असलेल्या नात्याचीच अदलाबदल करते!

या मालिकेचे कथानक आग्रा शहरात घडते. तेथील तिवारी कुटुंबही अन्य सर्वसामान्य कुटुंबियांसारखेच असून त्यातील सर्व सदस्य आपल्या परिवारात लहान दुडदुडणारी पावले पाहण्यास आसुसलेले आहेत. यातील फरक इतकाच की एरवी गर्भवती न राहिल्याबद्दल अन्य सासवांसारखी रेणुका ही आपल्या सुनेला नावे ठेवत नाही किंवा तिच्यावर दडपणही आणत नाही. उलट लोक काय म्हणतील, या दडपणाला झुगारून देऊन सासुबाई स्वत:च आपल्या पतीकडून गर्भवती राहून आपल्या कुटुंबियांना ‘चांगली बातमी’ देण्याची तयारी करतात! कारण तुमची सून गर्भवती राहण्याची शक्यता नसेल, तर आपल्या वंशाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी आपल्याच कुटुंबियांवर अवलंबून राहणे केव्हाही योग्यच ठरते. या सासू-सुनेचे हे आगळे नाते आणि त्यांनी आपल्या नात्यात केलेली अदलाबदल हाच ‘हमारीवाली गुड न्यूज’ या नव्या मालिकेच्या कथानकाचा आत्मा आहे.

मालिकेत २३ वर्षीय नाव्या तिवारी या सुनेची भूमिका टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सृष्टी जैन रंगवीत असून ती यात बालवाडीतील मुलांना शिकविणारी शिक्षिका असते. तिला स्वत:ला आपले मूल हवे असते; पण एका लहान मुलाला वाढविण्याची जबाबदारी खूप मोठी आहे, हे ती ओळखून असते. ही जबाबदारी लगेचच स्वीकारण्याची तिची तयारी नसते. योग्य वेळ येताच ती आपल्या जीवनाच्या या पुढील टप्प्यात पाऊल टाकण्याचा निर्णय घेते. सासू रेणुकाची भूमिका टीव्ही अभिनेत्री जूही परमार साकारणार आहे. ती आपले घर एकहाती सांभाळीत असते. ती खंबीर मनाची तरीही देवभोळी असते. आजूबाजूच्या घरांतील सासवांचा समावेश असलेल्या आपल्या भागातील कीर्तन मंडळीची ती सदस्य असते.

रेणुकाचा पती मुकुंदची व्यक्तिरेखा ज्येष्ठ अभिनेते शक्ती आनंद उभी करणार आहेत. त्यांचे किराणामालाचे दुकान असून ते कंजूष स्वभावाचे म्हणून प्रसिध्द असतात. ‘जीवन जसं चालू आहे, ते चांगलंच चालू आहे, त्यात उगीच बदलाबदल कशाला,’ ही त्यांची विचारसरणी असते. आपल्या मित्रांबरोबर क्रिकेट आणि राजकारणावर चर्चा करण्याची त्यांना आवड असते, पण पत्नी रेणुका आणि मुलगा आदित्य यांच्याशी त्यांचे नाते मात्र काहीसे तणावपूर्ण असते. पण आपली सून नाव्याशी मात्र त्यांचे नाते चांगले जुळते आणि आपल्या मुलांपेक्षा तीच त्यांना जवळची वाटू लागते. नाव्याच आपल्याला योग्य तऱ्हेने समजून घेऊ शकते, असे त्यांचे मत बनते.

‘हमारीवाली गुड न्यूज’मध्ये सून नाव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सृष्टी जैन या मालिकेच्या संकल्पनेबद्दल म्हणाली, “या मालिकेची संकल्पना अगदी भिन्न असून आजवरच्या सासू-सुनेच्या पारंपरिक नात्याची ती नव्याने व्याख्या करते. मी आता नाव्याची भूमिका साकारण्यास उत्सुक झाले असून मला या मालिकेकडून भरपूर आशा आहेत. खरं सांगायचं झाल्यास घरगुती नातेसंबंधांवर आधारित मालिकाच मला आवडतात कारण त्यातील घटना प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. म्हणूनच मी हमारीवाली गुड न्यूज मालिकेच्या प्रसारणाची उत्सुकतेने वाट पाहात आहे, कारण मला त्यावर प्रेक्षकांची कोणती प्रतिक्रिया उमटते, ते जाणून घ्यायचं आहे.”

‘हमारीवाली गुड न्यूज’मध्ये सासू रेणुकाची भूमिका रंगविणारी अभिनेत्री जूही परमार म्हणाली, “सासू-सुनेची गोष्ट ही कायमच निरंतर राहणार असून भारतीय प्रेक्षकांची ती सदैव करमणूक करीत राहील. पण यावेळी निर्मात्यांनी या मालिकेद्वारे सासू-सुनेच्या नात्याला एक वेगळीच कलाटणी दिली असून त्यांच्यातील नात्याचं समीकरणच बदलून टाकलं आहे. रेणुकाची भूमिका उभी करणं हे आव्हानात्मक काम आहे, कारण रेणुकाला एरवी समाजाच्या मताची काळजी वाटत असते. पण आपल्या सुनेला मूल होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर आपल्या पतीकडून स्वत:च पुन्हा गर्भवती राहून आपलं मूल आपल्या सुनेच्या पदरात टाकण्याचा क्रांतिकारक निर्णय ती घेते. असा संवेदनशील मुद्दा हाताळताना अंगावर खूपच जबाबदारी येते. त्यामुळे मी माझ्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, अशी आशा करते.”

“या मालिकेद्वारे आम्ही समाजातील काही बंद प्रश्नांना हात घातला असून सासू-सुनेच्या नात्याचा वेगळाच पैलू सादर केला आहे. ही संकल्पना भारतीय टीव्हीवर तर अगदीच नवी आहे. घरगुती आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित असलेली ही मालिका सध्याच्या मालिकांमध्ये ताज्या हवेची झुळुक घेऊन आली आहे. अशा मालिकेत एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद वाटतो. मी यातील मुकुंदाची भूमिका साकारण्यास उत्सुक बनलो आहे. माझ्या आजवरच्या सर्व भूमिकांपेक्षा ही भूमिका अगदीच वेगळी आहे. अशी ताजी भूमिका साकारण्यास मी अधीर झालो आहे.”

ज्येष्ठ अभिनेते, शक्ती आनंद

सास बनी है बहू की आस अशी परिस्थिती असलेल्या या मालिकेत सासू आणि सुनेच्या नात्यातील हा हृदयस्पर्शी आणि आगळा प्रवास पाहण्यास तयार व्हा.

पाहा ‘हमारीवाली गुड न्यूज’ लवकरच फक्त ‘झी टीव्ही’वर!