सेलेब्रेटी आणि त्यांचा फिटनेस जाणून घ्यायचा आहे? या अभिनेत्रीने आणलाय खास कार्यक्रम!

शारीरिक सकारात्मकतेचा खंदा पुरस्कार करणारी हुमा ही शरीर, मन आणि आत्मा यांच्या पोषणासाठी आवश्यक असलेली कोणतीही नवीन गोष्ट करायला कधी घाबरत नाही.या शोच्या माध्यमातून तिने त्याबद्दलचे अनुभव सांगितले आहेत.

  भारतातील अगदी नवीन आणि आघाडीची जीवनशैली वाहिनी ‘झी झेस्ट’ला त्यांचा अगदी नवीन शो ‘फिट फॅब फिस्ट विथ हुमा कुरेशी’दाखल करताना अतिशय आनंद होत आहे. एखादी व्यक्ती सेलिब्रिटी कशी होते या प्रेक्षकांच्या जिज्ञासेला पुरेपूर खाद्य देण्याचे काम या मालिकेच्या माध्यमातून होणार आहे. हुमा कुरेशी या अत्यंत देखण्या अशा चित्रपट अभिनेत्रीच्या अधिपत्याखाली हा शो सुरु होत असून त्यातून सेलिब्रिटीच्या जीवनशैलीवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. तिच्या फिटनेस, अन्नपदार्थ आणि फॅशन यांबाबतचाप्रवास आणि अनुभवाच्या माध्यमातून ही जीवनशैली प्रेक्षकांसमोर येणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

   

  या शोचा प्रीमियर १३ मार्च रोजी होत असून तो संपूर्णतः ‘४ के’मध्ये चित्रित झाला आहे. एखादा प्रख्यात बॉलीवूड कलाकार सूत्रसंचालन करत असलेला ‘झी झेस्ट’चा हा पहिला शो आहे. आपणही ग्लॅमरस आयुष्य जगावे या प्रेक्षकांच्या आकाक्षेला अनुसरून हा शो साकारला गेला आहे. ग्लॅमरस आयुष्य जगण्यासाठी काय करावे लागते, याची उत्तरे हा शो देतो.ही अत्यंत जिंदादिल आणि प्रतिभावान अशी अभिनेत्री तिच्या अपार अशा मेहनतीचा नमुना पेश करत स्पॉटलाईट म्हणजे काय हे समोर आणते. अगदी नवीनतम अशी शैली, आरोग्यमंत्र आणि लोकप्रिय पाककृती यांवर ती मनमुराद गप्पा मारते आणि त्यांतील आव्हाने अधोरेखित करते. ‘फिट फॅब फिस्ट विथ हुमा कुरेशी’ हा शो तज्ञांच्या कळपात घुसतो आणि त्यांच्या माध्यमातून एक नवीन प्रकाशझोत त्याला प्राप्त होतो. त्यातून मग तिची अमर्याद अशी हिंमत आणि आवड समोर येते. डिझायनर पायल सिंघलबरोबरचस्टायलिस्ट पर्निया कुरेशी आणि मोहित राययांच्याबरोबर कपड्यांची तयारी तेफिटनेस स्पेशलिस्ट नम्रता पुरोहित, यास्मिन कराचीवाला आणि शिवोहम यांच्याबरोबर केलेली  मेहनत या सर्व गोष्टी समोर येतात. प्रेक्षकांना हे किती कठीण आहे हे कळून चुकते. सेलिब्रिटीच्या आयुष्यात त्यांच्या ऊंचीवर पोहोचल्यावरचे मापदंड सांभाळण्यासाठी किती मेहनत करावी लागते आणि त्यासाठी समर्पण लागते या गोष्टी अगदी प्रभावीपणे त्याद्वारे समोर येतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

  मुळची दिल्लीची असलेली हुमा २०१० मध्ये भारताच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत आली आणि तिने आपलीअभिनयातील कारकीर्द सुरु केली. आपल्या सहजतेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आणि आपल्या प्रामाणिक अभिनयातून अनेक गौरव प्राप्त केले. आपल्या या प्रवासाबद्दल तिला सार्थ असा अभिमान आहे आणि या नव्या अशा वळणाबद्दल तिला उत्कंठा आहे. त्याबद्दल हर्शोत्फुल्लीत झालेली हुमा म्हणते, “या शोच्या माध्यमातून मला माझ्या प्रेक्षकांबरोबर अधिक अर्थपूर्ण पद्धतीने जोडले जाणे शक्य होणार आहे. माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून महत्वाकांक्षी काम प्रेक्षकांसमोर येते. मात्र त्यामध्ये एखाद्या कलाकाराला त्याच्या आयुष्यात सर्वच आघाड्यांवर कशाप्रकारे संतुलन साधावे लागत मार्गक्रमण करावे लागते, त्याबद्दलची सत्यस्थिती समोर येत नाही. प्रेक्षकांनी माझी विमानतळ, जिम आणि पुरस्कारांच्या रात्रींची छायाचित्रे पाहिली असतील पण ‘फिट फॅब फिस्ट’त्याही पलीकडे जातो. त्या माध्यमातून पडद्यामागे चांगले दिसण्यासाठी आणि योग्य अदाकारी करण्यासाठी जी मेहनत घेतली आहे ती किती गरजेची असते आणि त्यासाठी तेवढेच चैतन्य कसे ओतावे लागते, या बाबी पुढे येणार आहेत.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

  शारीरिक सकारात्मकतेचा खंदा पुरस्कार करणारी हुमा ही शरीर, मन आणि आत्मा यांच्या पोषणासाठी आवश्यक असलेली कोणतीही नवीन गोष्ट करायला कधी घाबरत नाही.या शोच्या माध्यमातून तिने त्याबद्दलचे अनुभव सांगितले आहेत. सकाळी लवकर उठून केलेला योगा,कृष्णा श्रॉफबरोबर केलेले किकबॉक्सिंग आणि अक्षय कुमारच्याअकादमीमध्ये सेल्फ डिफेन्सचे गिरवलेले धडे या सर्व बाबींबद्दल ती बोलते. या भागांमध्ये तिने घाम गाळायला लावणारे, भरपूर मेहनत करून घेणारे आणि काहीवेळा धोकादायक व्यायामप्रकारकेले आहेत. त्यातून प्रेक्षकांना प्रेरणा आणि मनोरंजन या दोन्ही बाबी मिळतात. हे सर्व केल्यावर पापाराझी, थाटमाट, तक्तपोशी या गोष्टींसाठी ती ऊर्जा कुठून आणते, हा प्रश्न साहजिकच कोणालाही पडेल. त्यासाठी मग या शोचा एक वेगळा आणि समर्पित भाग हुमावर चित्रित झाला आहे. त्यात ती अगदी पोषक आणि अगदी चविष्ट अशा खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसते. शहरातील काही अत्यंत नावाजलेल्या शेफनी बनविलेल्या तर काहीवेळा अगदी तिने स्वतः बनविलेल्या पदार्थांचा समावेश त्यात असतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)