कोरोनाचा मराठी चित्रपट प्रदर्शनाला फटका, ‘झिम्मा’चे प्रदर्शनही लांबणीवर, कलाकारांनी शेअर केला खास VIDEO

‘झिम्मा’ चित्रपटातील कलाकारांनी एकत्रित येत या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडीओ तयार केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनलॉक नियमांतर्गत चित्रपट गृहे सुरु झाली होती. शिवाय नवे चित्रपट मोठ्या आशेने प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे त्यामुळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. यामध्येच आता बहुचर्चित ‘झिम्मा’ या चित्रपटाचे प्रदर्शन देखील लांबणीवर टाकण्यात आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

  सोनाली कुलकर्णीने हा व्हिडिओ शेअर केला आहे, सोनाली म्हणते,  झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला…हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो…आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची…कोरोनासोबत दोन हात करण्याची…सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने, आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळुया! सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया…लवकरच भेटूया, ‘चित्रपटगृहातच!’, असं कॅप्शन सोनालीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by kshitee jog (@kshiteejog)

  आज वर्षभराने इतकी मोठी स्टारकास्ट असलेला आणि धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि क्रेझी फ्यू फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर इरावती कर्णिक लिखित या चित्रपटाची निर्मिती क्षितीसह स्वाती खोपकर, अजिंक्य धमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपाम मिश्रा यांनीही केली आहे.

  अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले असून संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पहिले आहे. ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे.