येणार ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चा सीक्वेल येणार, हृतिकने केला खुलासा म्हणाला…

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे झोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे.

  ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा.’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ, कल्कि कोचलिन मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील हृतिक, अभय आणि फरहान या तिघांच्या मैत्री तर सगळ्यांची लाडकी झाली. खरतर हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे उलटली आहेत. त्यानिमित्ताने हृतिक मुलाखत एक खुलासा केला आहे. या मुलाखतीमध्ये त्याने ‘जिंदगी ना मिलेगा दोबारा’ या चित्रपटाच्या सीक्वेल येणार असं म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  या मुलाखतीमध्ये त्याला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाच्या सीक्वेल विषयी विचारण्यात आले होते. तेव्हा तो म्हणाला, ‘नक्कीच सीक्वेल होऊ शकतो. तो पुढच्या ५ वर्षांनी येणार की १५ हे माहिती नाही. लोकांना चित्रपटाचा सीक्वेल हवा म्हणून झोया तो करेल असे मला वाटत नाही. पण जर तिला मनातून वाटले तर ती नक्की त्यावर काम करेल’ असेल हृतिक म्हणाला.

  ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचे झोया अख्तरने दिग्दर्शन केले आहे. तसेच चित्रपटाला म्यूझिक शंकर एहसान लॉयने दिले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता चाहते या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहात आहेत.