झिशान सिद्दीकी म्हणतात सलमानवर आरोप करणे थांबवा

अभिनेता सुशांच सिंह राजपूतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. घराणेशाही करणाऱ्यांमध्ये सलमान खानचे नावही घेतले जात आहे. अभिनव कश्यपने तसा आरोप केला

अभिनेता सुशांच सिंह राजपूतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, अशी चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. घराणेशाही करणाऱ्यांमध्ये सलमान खानचे नावही घेतले जात आहे. अभिनव कश्यपने तसा आरोप केला होता. मात्र आता सलमान खानवर असे काही आरोप करू नका, असे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी याने एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे.

झिशान सिद्दीकी यांनी या व्हिडिओमध्ये २०१४ चा एक किस्सा सांगितला आहे. कोणत्याही गोष्टीचा गवगवा न करता मदत कशी करायची हे सलमानने शिकविले असल्याचे सिद्दीकी यांनी म्हटले आहे. त्याच्यावर असे घराणेशाहीचे आरोप करणे चुकीचे आहे, ते थांबवावे असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.