
आमिर खानने (Aamir Khan) ‘लगान’ (Lagaan) चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या घरी मरिना येथे पार्टी साजरी केली. (21 Years Of Lagaan) या सोहळ्यासाठी या चित्रपटातील नामवंत कलाकार त्याच्या घरी उपस्थित होते.
अलीकडेच सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) ‘लगान’ (Lagaan) चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याच्या घरी मरिना येथे पार्टी साजरी केली. (21 Years Of Lagaan) या सोहळ्यासाठी या चित्रपटातील नामवंत कलाकार त्याच्या घरी उपस्थित होते. (Lagaan Team Party) ‘लगान’ हा १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी चित्रपट आहे . ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता.
आमिर खानच्या प्रॉडक्शनने ‘लगान’ टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील ‘चले चलो’ हे गाणे वाजत असून संपूर्ण टीम एकत्र मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
आमिर खान आणि संपूर्ण टीमसाठी ‘लगान’ला भावनिक महत्त्व आहे. २०२१ मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्टार्सनी व्हर्चुअल गॅदरिंग केले होते. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, लगानला आत्तापर्यंत यश मिळत आहे. युकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
‘लगान’ चित्रपटामध्ये १८९३ मध्ये भारतावर ब्रिटीश साम्राज्याच्या वेळी व्हिक्टोरियन कालखंडाच्या शेवटी घडलेली एक कहाणी आहे. हा चित्रपट आशुतोष गोवारिकर यांनी दिग्दर्शित केला होता आणि आमिर खान प्रॉडक्शन्सकडून याची निर्मिती करण्यात आली होती.