29 वर्षीय तमिळ अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेमातलं अपयश ठरलं कारण!

दीपानं अल्पावधीत आपल्या अभिनयानं लाखो चाहत्यांची पसंती मिळवली होती. सोशल मीडियावर दीपा ही नेहमीच सक्रीय राहत होती. तिचा चाहतावर्गही मोठा होता.

    तमिळ चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. साऊथची उदयनमुख अभिनेत्री दीपा उर्फ पॉलिन जेसिका हिने आत्महत्या केली आहे. दीपाचा मृतदेह तिच्या अपार्टमेंटमधे सापडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या प्रेम प्रकरणातू आलेल्या नैराश्यातून तिने असे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे.

    दीपानं घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तिच्या घरात एक सुसाईड नोटही सापडली आहे. मात्र, या चिठ्ठीत कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरू केला आहे. दीपा चेन्नईच्या विरुगम्बक्कम येथील मल्लिकाई एव्हेन्यूवर एकटीच राहत होती. नातेवाईक सतत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिचा फोन न आल्याने तिचा मित्र घरी पोहेचला आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.