3 इडियट्स चित्रपटातल्या ‘चतुरचं’ मराठी सिनेसृष्टीत पदार्पण! ‘आईच्या गावात मराठीत बोल’ मध्ये ओमी वैद्य प्रमुख भुमिकेत

या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे

    2009 मध्ये थ्री इडीयट्स (3 idiots) चित्रपटाने प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. आमीर खान, आर माधवन, शरमन जोशी व्यतिरिक्त चतुरची भूमिक साकारणार अभिनेता ओमी वैद्यने प्रेक्षकांच खास लक्ष वेधून घेतलं. हाच ओमी वैद्य (omi vaidya) आता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मोठ्या  मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास येणार आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपटातुन ओमी वैद्य मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे .

    थ्री इडीयट्स चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी ,केन्यन ,मल्याळी ,आफ्रिकन आहे असे वाटत होत पण तो मराठी मुलगा आहे. ओमीने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच ह्या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. तर मग आता, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपटातुन ओमी प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

    अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर ह्यांनी अमेरिकेतच ह्या चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे .संगीत आणि पार्श्वसंगीत – अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे .या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.

    या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत.