Mumbai Mahotsav

जीवनाधार फाऊंडेशनच्या (Jeevanadhar Foundation) वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मुंबै महोत्सवा’त कलेसोबतच इतर क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा ४१ (Award To 41 Persons In Mumbai Mahotsav) प्रज्ञावंतांचा सन्मान केला जाणार आहे.

    फक्त मुंबईकरांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असणारा ‘मुंबै महोत्सव’ (Mumbai Mahotsav) सहा दिवस मुंबईमध्ये रंगणार आहे. जीवनाधार फाऊंडेशनच्या (Jeevanadhar Foundation) वतीनं आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मुंबै महोत्सवा’त कलेसोबतच इतर क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदा ४१ (Award To 41 Persons In Mumbai Mahotsav) प्रज्ञावंतांचा सन्मान केला जाणार आहे.

    मुंबै भूषण २०२२ पुरस्कार हा ॲड. उज्ज्वल निकम यांना तसेच  जीवनाधार जीवनगौरव २०२२ हा पुरस्कार निर्माते किरण शांताराम यांना प्रदान करण्यात येईल. याशिवाय मुंबै गौरव पुरस्कारानं गायिका सुलोचना चव्हाण, उर्मिला मातोंडकर, प्रशांत दामले, संगीतकार अशोक पत्की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार संजय पोतनीस यांच्यासह पुरस्कार नामावलीत विवेक देशपांडे, प्रसाद महाडकर, संकेत सावंत, कमलेश सुतार, आत्माराम परब, प्रभाकर वराडकर, डॉ. सुरेश नायर, कृष्णकांत ठाकूर, कुहू भोसले, संजय सावंत, श्री मंगेशदा, आरती अतीन कांबळे, शहानवाज शेख, नागेश मोरवेकर, जिजाबा पवार, डॉ. रमेश भारमल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

    मूर्तीकार विजय खातू यांना मरणोत्तर तर सामाजिक कार्य करणाऱ्या मित्रकुल या स्वयंसेवी संस्थेचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. राजेश खाडे हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष असून, खासदार गोपाळ शेट्टी, एकता मंचचे प्रा. अजय कौल व प्रशांत काशीद, माजी महापौर, नगरसेविका स्नेहल आंबेकर, विलेपार्ले लोकसेवा मंडळाचे बाबा कुलकर्णी आणि प्रदीप शेणॉय यांचा आयोजनात सहभाग आहे.

    यंदा १ ते ३ जानेवारी या कालावधीत बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे, विले पार्लेतील दीनानाथ नाट्यगृह, परेलमधील दामोदर नाट्यगृह येथे तर फक्त निमंत्रितांसाठी ४ ते ६ जानेवारी वर्सोवा येथे हा महोत्सव होणार आहे. एकूण सहा दिवस हा महोत्सव असणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करुन संध्याकाळी ६ ते १० यावेळेत सर्वत्र हा महोत्सव होणार आहे.