national film awards

यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा (68th National Film Awards) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जात आहे.

  दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा (68th National Film Awards) आज झाली आहे. यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जात आहे. तशी माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या (Press Information Bureau) अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात होती. नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमधून ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेला सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार ५ वेगवेगळ्या विभागात दिले जातात.

  या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत ‘सरदार उधम सिंग’, ‘शेरशहा’, ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ आणि ‘शेरनी’ हे चित्रपट असल्याचं बोललं जात आहेत. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ देखील या शर्यतीत असणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये चित्रपटासाठी सर्वात अनुकूल राज्य म्हणून मध्यप्रदेशची निवड करण्यात आली आहे.

  • शांतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुर्या आणि अजय देवगण या दोघांना अनुक्रमे ‘सुरराय पोट्रू’ आणि ‘तान्हाजी द अनसंग हिरो’ या चित्रपटासाठी देण्यात आला आहे.
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार बिजू मेनन यांना अय्यप्पानम कोशियम चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.
  • अपर्णा बालमुर्ती हिला ‘सुरराय पोट्रू’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
  • सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार ‘सुमी’या मराठी चित्रपटाला जाहीर झाला आहे.
  • ‘अय्यप्पनम कोशियम’ या मल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक सचिदानंदन केआर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • मनोज मुंतशिर यांना सैना सिनेमामधील गीतांसाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ ला देण्यात आला आहे.
  • राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार विवेक दुबे दिग्दर्शित ‘फनरल’ चित्रपटाला जाहीर झाला आहे.