allu, alia and kriti

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेत्री कृती सेननला (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    दिल्ली: चित्रपट रसिक ज्या सोहळ्याची वाट पाहत होते तो 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (69th National Film Awards) आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. खरंतर 24 ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

    ‘एकदा काय झालं’ (Ekda Kaay Zala) या सिनेमाला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेत्री कृती सेननला (Kriti Sanon) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ‘गोदावरी’चे (Godavari) दिग्दर्शन निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

    69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळादरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले,“राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचं संकट असताना कलाकार मंडळींनी मनोरंजनाचं मोठं काम केलं आहे. तुमच्यासारखी कलाकार मंडळी प्रेक्षकांचं नेहमीच मनोरंजन करत आले आहेत. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल”. (69th National Film Awards Winners List)

    69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

    – सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम सिंह
    – सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो
    – सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – 777 चार्ली
    – सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
    – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
    – सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
    – सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – Kadaisi Vivasayi
    – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)
    – सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
    – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)
    – विशेष ज्युरी पुरस्कार – शेरशाह
    – नर्गिस दत्त पुरस्कार – द काश्मीर फाइल्स
    – सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
    – सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
    – सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
    – सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह
    – सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंह
    – सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गंगुबाई काठियावाडी
    – सर्वोत्कृष्ट ॲक्शन डायरेक्टर पुरस्कार – RRR (स्टंट कोरिओग्राफर – किंग सॉलोमन)
    – सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)
    – सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर – व्ही श्रीनिवास मोहन)
    – सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
    – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
    – सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी