अभिनेता ते कॅामेडी किंग कसा होता प्रवास? कपिल शर्माच्या बायोपिकमधून येणार समोर…

फनकार कपिल शर्मावर बनणाऱ्या या बायोपिकचे नाव आहे. लायका प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला फुक्रे आणि 2017 साली आलेला फुक्रे रिटर्नचे दिग्दर्शक मृगदीप लाम्बा 'फनकार' दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात कपिल शर्माचा जिवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. कपिलच्या संघर्षाची कहाणी यात सांगण्यात येणार आहे.

  • ककपिल शर्मावरवरील बायेपिक मधून कळणार त्याची अनटोल्ड स्टोरी

सध्या बॅालिवूडमझध्ये बॅायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत चित्रपट, राजकारण, क्रिडा अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांवर बायोपिक बनवण्यात आले आहे. आता प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर लवकरच बायोपिक येणार आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) हा घराघरात प्राईम टाईमला आवडीने पाहिला जाणारा शो आहे. अभिनय आणि कॅामिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कपिल शर्माचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. आता या कॅामेडी किंगची बायोपिक लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

चित्रपटाचे शीर्षकही ठरले असून फनकार कपिल शर्मावर बनणाऱ्या या बायोपिकचे नाव आहे. लायका प्रॉडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. 2013 साली प्रदर्शित झालेला फुक्रे आणि 2017 साली आलेला फुक्रे रिटर्नचे दिग्दर्शक मृगदीप लाम्बा ‘फनकार’ दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात कपिल शर्माचा जिवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. कपिलच्या संघर्षाची कहाणी यात सांगण्यात येणार आहे.

‘देशातील सर्वात मोठा फनकार कपिल शर्माची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यास आम्ही उत्सुक आहोत. असे चित्रपट दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा म्हणाले,

कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी सांगण्यासाठी येणार आहे. कपिलने या कार्यक्रमाचा टीझरही शेअर केला आहे. कपिलच्या प्रोजेक्टचे नाव आहे, ‘आय एम नॉट डन येट” ( I am not done yet )