गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा : डॉक्टरांची माहिती

लतादीदींना कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यानंतर मागील रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, मात्र त्यांचे वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे (Under Observation) गरजेचे असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली.

    मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर ब्रीचकँण्डी रूग्णालयात (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा असल्याची माहिती डॉक्टर प्रतीक समदानी यांनी दिली आहे.

    लतादीदींना कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यानंतर मागील रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, मात्र त्यांचे वय ९२ वर्षे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे (Under Observation) गरजेचे असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा असून त्या बऱ्या होत असल्याची माहिती त्यांची भाची रचना शाह यांनी दिली.

    पुढील सात-आठ दिवस रुग्णालयातच

    कोरोनातून बरे होण्यासाठी किमान सात दिवस लागतात, त्यामुळे लतादीदींना अजून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, असेही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी आणि त्यांचे पथक लतादीदींवर उपचार करत आहेत. लतादीदींना कोविड न्युमोनिया झाला असून पुढील सात-आठ दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल, असे डॉ. समदानी यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून ऑक्सिजनची गरज भासली नाही.