दक्षिणेत गेलेला मराठी माणूस झाला कोट्यधीश; रजनीकांत यांना एका चित्रपटातून मिळाले 150 कोटी, कमाईतील अर्धी संपत्ती केली दान

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता रजनीकांत (Actor Rajinikanth) अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयातून त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दक्षिण भारतातील एकमेव असे स्टार आहे, त्यांची चर्चा अजूनही होत आहे. रिलीज होताच त्यांचे चित्रपट हिट होतात. सध्या त्यांचा नवीन चित्रपट 'जेलर'च्या (Movie Jailer) गाण्यामुळे चर्चेत आहेत.

  नवी दिल्ली : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता रजनीकांत (Actor Rajinikanth) अनेकदा चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयातून त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दक्षिण भारतातील एकमेव असे स्टार आहे, त्यांची चर्चा अजूनही होत आहे. रिलीज होताच त्यांचे चित्रपट हिट होतात. सध्या त्यांचा नवीन चित्रपट ‘जेलर’च्या (Movie Jailer) गाण्यामुळे चर्चेत आहेत.

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत यांनी यासाठी 150 कोटी रुपये घेतले आहेत. त्यांच्याकडे सुमारे 430 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चेन्नईच्या सर्वात पॉश भागात 35 कोटींचा त्यांचा आलिशान बंगला, मर्सिडीज-बेंझ जी वॅगन आणि लॅम्बोर्गिनी उरूससारखी वाहने आहेत. देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या अभिनेत्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  रजनीकांतने ‘अपूर्व रागंगल’ (1975) मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक के. बालचंदर होते. चेन्नईसोबतच बंगळुरू आणि पुण्यातील पॉश भागात रजनीकांत यांची घरे आहेत. बंगळुरू येथील त्यांच्या बंगल्याची किंमत 45 कोटी रुपये आहे. या भागात बडे व्यापारी, न्यायाधीश, राजकारण्यांची घरे आहेत.

  कमाईचा अर्धा भाग करतात दान

  तमिळमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा नायक अशी ओळख असलेले रजनीकांत त्यांच्या कमाईतील अर्धा भाग दान करतात. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत रजनीकांत यांनी कोणत्याही व्यावसायिक जाहिराती केल्या नाहीत. रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत हे त्यांच्या कमाईचा अर्धा भाग दान करतात. इतकेच नाहीतर चित्रपट चालला नाही तर ते पैसेही चित्रपट वितरकांना परत करतात, अशीही माहिती दिली जाते.

  चेन्नईमध्ये आहे लग्नमंडप

  याशिवाय त्यांचा चेन्नईमध्ये एक लग्नमंडपही आहे. या हॉलची जेवणाची जागा इतकी मोठी आहे की, 300 लोक एकत्र बसू शकतात. या सभागृहाची किंमत सुमारे 30 कोटी आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये, रजनीकांत यांनी या हॉलसाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला 6.5 लाखांचा करही भरला होता.