आजपासून बॉलिवूडचे पुन्हा अच्छे दिन?, प्रेक्षक पुन्हा थिएटरमध्ये जाणार का?, अक्षय-कतरिनाच्या आज रिलीज होणाऱ्या सूर्यवंशीने ठरणार कल

गेल्या दीड दोन वर्षांपासून तयार असलेले सिनेमे (Cinema) पाहण्यात आता प्रेक्षकांना इंटरेस्ट आहे का, याचे उत्तर आज मिळेल. आज रिलीज होणाऱ्या सूर्यवंशी (Suryavanshi) सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. बॉलिवूडसाठी ही या वर्षातील बिकट परीक्षा म्हणायला हवी, प्रेक्षकांचा पुढील महिनाभरात प्रतिसाद मिळाला नाही, तर बॉलिवूडचे एकूणच तंत्र बदलले जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

    मुंबई : ओटीटीमुळे (OTT) आता प्रेक्षक (Viewers) थिएटरमध्ये (Theatre) जाणे कमी करतील का, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील उत्तमोत्तम वेब (Web Series) सीरीज, दमदार स्टोरीज आणि चांगला अभिनय यामुळे प्रेक्षकांची टेस्ट बदलली आहे का, फक्त एक्शन आणि हिरो-हिरॉईनच्या नावांवर थिएटरमध्ये सिनेमे चालतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.

    गेल्या दीड दोन वर्षांपासून तयार असलेले सिनेमे (Cinema) पाहण्यात आता प्रेक्षकांना इंटरेस्ट आहे का, याचे उत्तर आज मिळेल. आज रिलीज होणाऱ्या सूर्यवंशी (Suryavanshi) सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. बॉलिवूडसाठी ही या वर्षातील बिकट परीक्षा म्हणायला हवी, प्रेक्षकांचा पुढील महिनाभरात प्रतिसाद मिळाला नाही, तर बॉलिवूडचे एकूणच तंत्र बदलले जाईल अशी शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

    सूर्यवंशीला चांगला प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर (Box Office) मिळाला तर संपूर्ण देशभरातील थिएटर व्यवसाय पुन्हा उभारी घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. सूर्यवंशी हा रोहित शेट्टीचा मसाला सिनेमा असून यात अक्षयकुमारसह सिंबाफेम रणवीर सिंह आणि सिंघम फेम अजय देवगण या तिन्ही बिग स्टाररचा समावेश आहे. सिनेमा देशभरात ३००० स्क्रिन्सवर रिलीज होणार असून १९ नोव्हेंबरपर्यंत दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही, त्यामुळे सूर्यवंशीचा मार्ग प्रशस्त झाल्यासारखे दिसते आहे. त्यामुळे दिवाळीत प्रेक्षकांना सिनेमा पाहायला असेल आणि तोही थिएटरला पाहायला असेल तर त्यांच्यासमोर फक्त सूर्यवंशी हा एवढा एकच पर्याय आहे. देशात अनेक राज्यात आता थिएटर्स पूर्ण म्हणजे १०० टक्के आसन क्षमतेने चालविण्यास परवानगी मिळाली आहे, याचाही फायदा सूर्यवंशीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    हा सिनेमा एका महिन्यानंतर नेटफ्लिक्सवरही पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षक सिनेमासाठी थिएटर्समध्ये येतील का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येते आहे. मात्र थिएटरमध्ये सिनेमा पाहणे आणि घरी सिनेमा पाहणे यात फरक असल्याने प्रेक्षक थिएटर्समध्ये जातील असा विश्वासही व्यक्त करण्यात येतो आहे.

    सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो १००, २०० कोटींच्या घरात जातो का, हे पाहण्याची ही वेळ नसल्याचेही सांगण्यात येते आहे., यानिमित्ताने प्रेक्षक थिएटर्समध्ये परतले तरी ती बॉलिवूडची मोठी उपलब्धी ठरणार आहे.

    सूर्यवंशीला यश मिळाले तर नेक सिनेमे रिलिजसाठी रांगेत आहेत. त्यात बंटी और बबली-२, सत्यमेव जयते-२, ८३ या सिनेमांचा समावेश आहे.