‘या’ कारणामुळे तेजश्रीने मालिकेला म्हटलं गुडबाय, पण आता महाराष्ट्राला येतेय जून्या सूनबाईंची आठवण!

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी?, अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात.

  ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. याआधी ‘आग्गबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्याजागी आलेली ही नवीन मालिका तशीच असेल की, यात आणखी काही वेगळं दाखवलं जाईल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या मालिकेतील ‘शुभ्रा’, ‘बबड्या’, ‘आसावरी’ आणि ‘अभिजित राजे’ ही पात्र अतिशय प्रसिद्ध झाली आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

   

  ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत ‘शुभ्रा’च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा, तर काहींसाठी नवखा वाटणारा ‘उमा पेंढारकर’ हा चेहेरा दिसतो आहे. मात्र, प्रेक्षक अजूनही जुन्या ‘शुभ्रा’ला अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला मिस करत आहेत. या नवीन आलेल्या ‘आग्गबाई सुनबाई’ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी बऱ्याच वेगळ्यावेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  म्हणून तेजश्रीने मालिका सोडली

  परंतु, अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला या मालिकेतून एवढी प्रसिद्धी मिळत असूनही, तिने ही मालिका का सोडली असावी?, अशी शंका चाहत्यांच्या मनात आहे. शेवटी सगळ्यांना आयुष्यात पुढे जायचे असते, वेगळी वेगळी ध्येय पूर्ण करायची असतात. तसेच काहीसे तेजश्री बरोबर झाले आहे. तेजश्री आता लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता शर्मन जोशी सोबतचा तिचा ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.