Video – संजना शिकवणार मेहताला धडा, ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसणार स्त्री शक्तीचं नवं रुप

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अनेक ट्विस्ट(Twists In Aai Kuthe Kay karte) पाहायला मिळत आहेत. एकीकडे मालिकेत गणेशोत्सव संपन्न झाला आहे तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप पाहायला मिळणार आहे.

    स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अनेक ट्विस्ट(Twists In Aai Kuthe Kay karte) पाहायला मिळत आहेत. एकीकडे मालिकेत गणेशोत्सव संपन्न झाला आहे तर दुसरीकडे लवकरच स्त्री शक्तीचं नवं रूप पाहायला मिळणार आहे. कारण मालिकेत आता संजना तिचा बॉस मेहता(Sanjana Will Take Revange With Mehta) याला धडा शिकवणार  आहे.

    मेहताने दिलेल्या कॉम्प्रोमाइजच्या ऑफरमुळे संजना पुर्णपणे कोलमडून गेली आहे. आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला घाबरून न जाता त्या विरोधात लढण्यासाठी अरुंधतीने संजनाला बळं दिलं आहे. त्यामुळे संजनाला धीर आला आहे. ती मेहताला अद्दल घडवणार आहे.

    मेहताचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी अरुंधती आणि देशमुख कुटुंब संजनाला साथ देणार आहे. यावेळी अरुंधतीला वाईटसाईट बोलून तिच्यावर हात उचलायला गेलेल्या मेहतावर संजना हात उगारणार आहे.

    आपली नोकरी परत मिळवण्यासाठी संजना जीवाचा आटापिटा करत आहे. आपल्या कामाचा विचार व्हावा म्हणून कंपनीचा बॉस मेहता याला भेटायला गेलेल्या संजनाला एका वेगळ्याच प्रसंगाला समोर जावं लागतं. कामाच्या बदल्यात तू माझ्यासोबत कॉम्प्रोमाईज करावं अशी ऑफर मेहता संजनाला देतो. तसेच तो तिच्यावर अनेक आरोप देखील करतो. या सगळ्याला घाबरून संजना घरी निघून जाते. हा प्रकार अरुंधतीला कळल्यावर ती संजनाला मेहता विरोधात लढण्याचा सल्ला देते. मालिकेच्या येत्या काही भागात प्रेक्षकांना महिला शक्तीचं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे.