
‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kau karte) मालिकेतील देशमुख कुटुंबातलं प्रत्येकजण प्रेक्षकांना खूप जवळचं वाटतं. विशेषत: या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर ही अनेक महिलांची आवडती अभिनेत्री आहे. मालिकेला ३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्टार प्रवाहने (star pravah) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या स्टार प्रवाहवरील (Star Pravah) मालिकेला ३ वर्ष पूर्ण (3 Years Of Aai Kuthe Kay Karte) झाली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. त्यामुळेच या मालिकेने टीआरपीमध्ये (TRP) नेहमीच बाजी मारली आहे.
View this post on Instagram
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील देशमुख कुटुंबातलं प्रत्येकजण प्रेक्षकांना खूप जवळचं वाटतं. विशेषत: या मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर ही अनेक महिलांची आवडती अभिनेत्री आहे. मालिकेला ३ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्टार प्रवाहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर करत लिहिण्यात आलं आहे की, “आज ‘आई कुठे काय करते !’ या मालिकेला पूर्ण होत आहेत ३ वर्षे…आपण या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!!त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!”.
मालिकेतल्या सध्याच्या घडामोडीबद्दल सांगायचं तर अभिषेक आणि अनघाला मुलगी झाली आहे. मात्र अभिच्या एका चुकीमुळे अनघा त्याच्यावर नाराज आहे. मात्र संपूर्ण देशमुख कुटुंब सध्या चिमुकलीचं कौतुक करण्यात व्यस्त आहे.