aamhi sare khawayye

‘आम्ही सारे खवय्ये’ येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हेच या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत.

    माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो, असं म्हणतात. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं ? यासाठी त्या विविध माध्यमे शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ (Aamhi Sare Khawayye) नित्यनियमाने करत होता. आता जवळपास २ वर्षानंतर महिला वर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हेच या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत.

    कोल्हापूरपासून या पर्वाची सुरुवात होत असून महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटीमध्ये आम्ही सारे खवय्येचे भाग रंगणार आहेत. ‘आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी’ हे या नवीन पर्वाचे नाव असून या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत आणि कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.

    या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे आणि उत्सुक आहे परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वा. झी मराठीवर पाहता येणार आहे.