‘सीतारे जमीन पर’ मधून पुनरागमन करण्यास आमिर सज्ज, चित्रपटाच्या रिलीज डेटविषयीही सांगितलं!

आमिरने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या आगामी 'सीतारे जमीन पर' चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी सांगितलं. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे.

  बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. तो एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारअसल्याचं म्हण्टलं जात होतं. रिपोर्टनुसार आमिर ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक करणार आहे. सध्या या आमिर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाशी संबंधित अगदी लहानसहान अपडेट्स मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक अपडेट समोर आले आहे. आमिरने या चित्रपटाच्या रिलीज डेट बद्दल खुलासा केला आहे.  आठ वर्षांनंतर आमिर आपला चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे. त्याचा शेवटचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ 2016 मध्ये ख्रिसमसला रिलीज झाला होता.

  कॅमिओ भूमिकेत दिसणार आमिर

  त्याच्या आगामी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलताना आमिर म्हणाला, ‘मी नुकतंच माझ्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केली आहे, ज्याचं शीर्षक ‘सितारा जमीन पर’ आहे. या वर्षाच्या अखेरीस नाताळच्या मुहूर्तावर तो रिलीज करण्याचा आमचा विचार आहे. हा एक मनोरंजक चित्रपट आहे, मला कथा आवडली. या चित्रपटात तुम्ही मला मुख्य अभिनेता म्हणून पाहू शकणार नसले तरी मी यात काही छोट्या भूमिका करत आहे. तो पुढे म्हणाला की, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात ते पाहूया.

  जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत?

  2007 मध्ये आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटात आमिर खान शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. आता आमिरने त्याचा आगामी चित्रपट ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग सुरू केली आहे. अलीकडेच या चित्रपटाविषयी मीडियाशी बोलताना आमिर म्हणाला, ‘सितारे जमीन परमध्ये मी तुम्हा सर्वांना एका वेगळ्या रुपात भेटणार आहे. हे पात्र खूप भावनिक आहे. तुम्हाला हा चित्रपटही आवडेल अशी आशा आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘सीतारे जमीन पर’ मध्ये जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. जेनेलिया आणि आमिरचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे.

  आमिर खानचा वर्क फ्रंट

  2022 मध्ये ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मात्र, तो निर्माता म्हणून सक्रिय आहे. हा अभिनेता राजकुमार संतोषी आणि सनी देओलसोबत ‘लाहोर 1947’मध्ये काम करत आहे. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक चित्रपट एकाच वेळी येणार आहेत. यावर्षी रिलीज होणारे दोन चित्रपट आहेत, पहिला किरण राव दिग्दर्शित ‘मिसिंग लेडीज’ आणि दुसरा संजय मिश्राचा ‘प्रीतम प्यारे’.