aamir khan playing football with son azad

आमिर खानचा मुलगा (Aamir Khan) आझादसोबतचा (Azad Khan) एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर आपल्या मुलासोबत फुटबॉल मॅच (Aamir Playing Football With Son) खेळताना दिसत आहे.

    पावसात खेळणं हे अनेकांना आवडतं. मुंबईत (Mumbai) पावसाने हजेरी लावली आहे. अशातच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा (Aamir Khan) आझादसोबतचा (Azad Khan) एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये आमिर आपल्या मुलासोबत फुटबॉल मॅच (Aamir Playing Football With Son) खेळताना दिसत आहे. आमिर आणि त्याचा मुलगा आझाद पावसाचा आनंद घेत आहेत. पिता-पुत्राची ही जोडी फुटबॉल खेळण्यामध्ये मग्न झाली आहे.


    आमिर खानसाठी त्याचा मुलगा सर्वस्व आहे. आमिर अनेकदा त्याला खेळासाठी प्रोत्साहीत करताना दिसला आहे. कारण खेळ हे प्रत्येकाच्या तंदुरुस्ती आणि वैयक्तिक वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

    आमिर एक उत्तम क्रीडा निरीक्षक आणि क्रीडाप्रेमी आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक खेळाबद्दल उत्सुकता आहे. टेबल टेनिसपासून ते कुस्ती आणि क्रिकेटपर्यंत प्रत्येक खेळाकडे आमिरचा कल असतो. तो केवळ स्वत:च खेळात रस घेत नाहीत तर त्यात आपल्या मुलांनाही सहभागी करून घेतो.