किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान तिसरं लग्न करणार का ? या प्रश्नाचं ‘हे’ आहे उत्तर

आमिर तिसरं लग्न (Third Marriage Of Aamir Khan) करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये(Aamir Khan And Fatima Sana Sheikh Relationship) असल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

    बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान(Aamir Khan) गेल्या काही दिवसांपासून  त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर तिसरं लग्न(Third Marriage Of Aamir Khan) करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये(Aamir Khan And Fatima Sana Sheikh Relationship) असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र याविषयी आमिर खानच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

    आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. येत्या काही दिवसात आमिर तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चा समोर येत आहे.विशेष म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत तो लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. यावरुन आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

    मात्र आमिरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, आमिर खान तिसरं लग्न करणार असल्याची बातमी पूर्णत: चुकीची आणि खोटी आहे. आमिर तिसरे लग्न करण्याच्या विचारात नाही. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या पूर्णपणे निराधार आहेत.