
आमिर खानचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह(aamir khan`s corona test is positive) आल्यानंतर तो घरीच क्वाइंटाईन आहेत. कोरोनाच्या सगळ्या नियमांचे तो पालन करत आहेत. त्याच्या तब्येतीमध्ये लवकरच सुधारणा होण्याची शक्यता असल्याचेे आमिर खानच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्येही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. आता बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
आमिर खानचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो घरीच क्वाइंटाईन आहेत. कोरोनाच्या सगळ्या नियमांचे तो पालन करत आहेत. त्याच्या तब्येतीमध्ये लवकरच सुधारणा होण्याची शक्यता असल्याचेे आमिर खानच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
View this post on Instagram
आमिर खानच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या वर्षी आमिर खानसोबत काम करणाऱ्या ७ जणांना कोरोना झाला होता. या ७ जणांमध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, ड्रायव्हर आणि घरातले नोकर यांचा समावेश होता. तेव्हा आमिर खानला सुदैवाने काही झाले नव्हते. मात्र आता त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वीच आमिर खानने सोशल मीडियापासून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तो चर्चेत आला होता. आता त्याला कोरोना झाल्याने चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करु लागले आहेत.
आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये आमिर खानसोबत करिना कपूरदेखील झळकणार आहे.