इरा खान अलीकडेच चुलत बहीण झेनच्या लग्नानाला गेली होती. यावेळी कुटुंबासोबत नूपुरदेखील तिच्यासोबत होतो. इराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. रिपोर्ट्सनुसार, इरा आणि नूपूर हे गेल्या सहा महिन्यांपासून डेट करतायेत.
आमिर खानची मुलगी इरा खान आणि तिचा फिटनेस कोच नुपूर शिखर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करतेय. व्हॅलेंटाईन वीकमध्ये इराने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत रिलेशनशीप कन्फर्म केलय. इराने प्रॉमिस डेला नुपूरसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यात ‘माय व्हॅलेंटाईन’ चा हॅशटॅगही देण्यात आला आहे.
View this post on Instagram
यावेळी इराने सुंदर कॅप्शनही लिहीलं आहे. इरा म्हणते, तुझ्यासोबत राहणं आणि तुला वचन देणं अभिमानाची गोष्ट आहे. नुपूर शिखरने इराला ‘आय लव यू’ म्हणत या पोस्टला उत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
नुपूर शिखर हा सेलिब्रेटी फिटनेस कोच आहे. सध्या तो आमिर खान, इरा खान आणि सुष्मिता सेन यांना ट्रेनिंग देतोय. इरा खानने अद्याप चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले नाही, ती थिएटर आणि दिग्दर्शनात तिची आवड जोपासत आहे.