parineeti chopra and raghav chadhdha

आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीति चोप्रा यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral Video) झाला होता. या व्हिडिओमध्ये एका रेस्टॉरंटमधून ते दोघं एकत्र बाहेर येताना दिसले. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटबाहेरचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले गेले.

अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि खासदार राघव चड्ढा(Raghav Chadha) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरू असल्याची माहिती मिळाली होती. अशातच आता या दोघांच्या नात्याबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केलंय. या ट्वीटमुळे या दोघांनी गुपचूप साखरपुडा तर उरकला नाही ना ? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

संजीव अरोरा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,“राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं मनापासून अभिनंदन. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा”.

एका रिपोर्टनुसार परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे. अशातच आप खासदारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीति चोप्रा यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral Video) झाला होता. या व्हिडिओमध्ये एका रेस्टॉरंटमधून ते दोघं एकत्र बाहेर येताना दिसले. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटबाहेरचा हा व्हिडिओ होता. या व्हिडिओमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले गेले.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा सलग दोन दिवस एकत्र दिसले, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या. पण, ते दोघेही चांगले मित्र आहेत. ते दोघे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिकले आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत. तसेच राघव चढ्ढा ट्विटरवर फक्त 44 जणांचा फॉलो करतात, त्यापैकी फक्त दोन जण बॉलिवूडमधील कलाकार आहेत. त्यापैकी एक गुल पनाग आहे, जी आम आदमी पार्टीची सदस्य आहे, तर दुसरी आहे परिणीती चोप्रा. आता राघव आणि परिणीती यांच्या नात्याबद्दल ते दोघं कधी खुलासा करतायत , याची चाहते वाट बघत आहेत.