अबब! जेष्ठ दिग्दर्शकाने चाटले अभिनेत्रीचे पाय

    बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायम विविध वादांमुळे चर्चेत येत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात राम गोपाल वर्मा अभिनेत्रीचे पाय चाटताना दिसत आहे.

    दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचा डेंजरस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या सुरु असून याच निमित्ताने हा प्रकार रामगोपाल वर्मा याने केला आहे. सोशल मीडियावर राम गोपाल वर्माचा त्याच्याच डेंजरस चित्रपटातील अभिनेत्रीचे पाय चाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्यावर टीकेचा वर्षाव होतो आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करत नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा दिग्दर्शक अशाप्रकारचे वर्तन कसे काय करु शकतो असा प्रश्न नेटकऱ्यांनी यानिमित्तानं केला आहे. असं करणं हे त्याला शोभतं का, बॉलीवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्यांना घेऊन लोकप्रिय चित्रपट देणारा दिग्दर्शक एवढा आंबटशौकीन कसा काय झाला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.