abhijeet bichukle and shahrukh khan

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) म्हणाला,“मला असं वाटतं की शाहरुख खान बिग बॉस बघत होता. सलमान आणि मी एका इंडस्ट्रीमध्ये आहोत. इंडस्ट्री आणि राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमातील लूक माझ्यासारखा आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे”.

    बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत सापडला आहे. आता त्याने ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील शाहरुख खानच्या (Shahrukh Khan Hairstyle) हेअरस्टाईलबाबत मोठं विधान केलं आहे.

    साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाला,“मला असं वाटतं की शाहरुख खान बिग बॉस बघत होता. सलमान आणि मी एका इंडस्ट्रीमध्ये आहोत. इंडस्ट्री आणि राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. शाहरुखचा ‘पठाण’ सिनेमातील लूक माझ्यासारखा आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे”.

    अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला,“मी लहान असताना १९९१ साली संजू बाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. पण आता २०२२ वर्षात जी स्टाइल आणली गेली आहे ती माझ्यामुळे आली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, शाहरुख खान बिग बॉस बघत होता. भाईजानचे बिग बॉस त्याने पाहिलेलं असावं. त्यामुळे शाहरुखने ‘पठाण’ सिनेमात केलेली स्टाईल माझीच आहे”.

    आता शाहरुख खान यावर काय प्रतिक्रिया देणार ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. बिचुकलेचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे ‘पठाण’ सिनेमाला विरोध होत असताना बिचुकलेच्या वक्तव्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.