abhijeet bichukle

अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai), देवोलीना भट्टाचार्जी(Devolina Bhattacharji) आणि अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) हे तीन स्पर्धक ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये सहभागी झाले. मात्र अभिजीत बिचुकलेंना कोरोनाची लागण(Abhijett Bichukle Corona Positive) झाल्याची माहिती समोर येत आहे.

    ‘बिग बॉस हा शो खूप लोकप्रिय आहे. सध्या बिग बॉस हिंदीचे (Bigg Boss 15)१५ वे पर्व सुरु आहे. नुकतंच बिग बॉस १५ च्या घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची(Wild Card Entry) एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai), देवोलीना भट्टाचार्जी(Devolina Bhattacharji) आणि अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) हे तीन स्पर्धक ‘बिग बॉस’ हिंदीमध्ये सहभागी झाले. मात्र अभिजीत बिचुकलेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकले सहभागी होणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

    नुकतंच बिग बॉस हिंदीच्या वीकेंड का वॉर या भागात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली होती. यात रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि अभिजीत बिचुकले यांचा समावेश होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत बिचुकले यांनी त्यांचे नाव या शो मधून रद्द केले आहे. अभिजीत बिचुकले यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.