तस्लिमा नसरीन यांनी केलं बच्चन पिता-पुत्राच्या टॅलेंटवर भाष्य,अभिषेकच्या विनम्र उत्तरावर नेटकरी फिदा

लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्या टॅलेंटबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे.

    बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतात. मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील अभिनेता आहे. लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्या टॅलेंटबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. पण तस्लिमा यांच्या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या उत्तरावर नेटकरी फिदा झाले आहेत.

    taslima tweet

    तस्लीम नसरीन यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, “अमिताभ बच्चन हे त्यांचा मुलगा अभिषेकवर इतकं प्रेम करतात की त्यांना वाटतं की त्यांच्या मुलामध्ये त्यांचं सगळं टॅलेंट अनुवांशिकरित्या आलं आहे. तसेच त्यांना वाटतं की, त्यांचा मुलगा सर्वोत्तम आहे. अभिषेक चांगला आहे, पण मला अभिषेक हा अमिताभ बच्चन यांच्या एवढा टॅलेंटेड वाटत नाही.”

    अभिषेकनं तस्लीम नसरीन यांच्या ट्वीटला रिप्लाय दिला की, “एकदम बरोबर आहे, मॅडम. टॅलेंट किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत माझी आणि त्यांची तुलना होऊच शकत नाही ते नेहमीच ‘बेस्ट’ राहणार आहेत. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे.” अभिषेकनं दिलेल्या या रिप्लायचं सध्या सोशल मीडियावर अनेक नेटकरी कौतुक करत आहेत.