राखी सावंत म्हणतेय, अभी तो मैं जवान हूँ विकिपीडियाने केलीय खोट्या वयाची नोंद

कुणाला बारीक व्हायचं असेल तर आपल्या तोंडावर ताबा ठेवा. यावर सेलिब्रिटी पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला की, तुला बारीक का व्हायचं आहे? यावर ती म्हणते, नाही, बारीक होणं आवश्यक आहे. नाही बारीक असणं गरजेचं आहे.

    मुंबई : राखी सावंत एक अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच चर्चेत असते. दर्शकहो मग ते बिग बॉसचं घर असू दे किंवा मग खऱ्या आयुष्यात कॅमेऱ्यासमोर येतेच येते तिचा हेतू हाच असतो की, मनोरंजन व्हायलाच हवं. असंच काहीसं राखी या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आणि सोबतच राखीने तिच्या वयाशी संबंधित एका गोष्टीचा खुलासाही केलाय. सोबतच ती स्वत:ला मेनटेन ठेवणार असल्याचंही सांगत आहे.

    व्हायरल व्हिडिओबाबत सांगायचं झालं तर राखी सावंतला फोटोग्राफर्सनी पाहिलं आणि तिच्या हातात ज्यूसचा ग्लास आहे, तेव्हा फोटोग्राफर्स राखीला पोझ द्यायला सांगतात तेव्हा राखी सावंत पोझ देताना फोटोग्राफर्सला विचारते, ” कुणाला बारीक व्हायचं असेल तर आपल्या तोंडावर ताबा ठेवा. यावर सेलिब्रिटी पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला की, तुला बारीक का व्हायचं आहे? यावर ती म्हणते, नाही, बारीक होणं आवश्यक आहे. नाही बारीक असणं गरजेचं आहे. येथे सर्वजण लवकरच विसरतात आपल्याला स्वत:ला हॉट ठेवावंच लागतं, चर्चेत ठेवावं लागतं आणि समाजसेवाही करावी लागते. तशी प्रत्येक गोष्ट मी करतच असते.

    या ठिकाणी उपस्थित पत्रकारांनी जेव्हा राखी सावंतला कोरोना लसीविषयी विचारलं असता राखी म्हणाली, “मी विनंती करते की, ३४, ३६ वर्षाच्या वयोगटातील व्यक्तींनाही लस द्यायलाच हवी, कारण मला कालच माहिती मिळाली आहे की, ४५ वर्षांच्या व्यक्तींनाच लस देत आहेत तर मग आम्ही ३६ वर्षाच्या लोकांनी काय करायचं?”

    त्यानंतर पत्रकारांनी राखीला तिचं वय विचारलं तेव्हा राखी म्हणाली, ” वास्तविक माझं वय ३७ वर्ष आहे, कशाला खोटं सांगायचं. थोडीशी आणखी बारीक असते तर १८ चीच दिसले असते.”

    राखीचं वय विकिपीडिया नुसार ४२ आहे, पण काल राखीने तिचं खरं वय मीडियाला सांगितलं. राखीबाबत बोलायचं झालं तर ती अलीकडेच बिग बॉसमध्ये दिसली होती.