अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री संजना सांघी यांचं ‘सांसें देने आना’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस

अभिनेताआदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री संजना सांघी यांचं ‘सांसें देने आना’ हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

    अभिनेताआदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री संजना सांघी यांचं ‘सांसें देने आना’ हे  प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस आलं. चिरंतन भट्ट यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि निर्माते अहमद खान यांनी कोरिओग्राफ केलेल्या ट्यूनवर ही जोडी त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दाखवताना दिसणार आहे.

    या गाण्यात आदित्य रॉय कपूर एका जबरदस्त काळ्या पोशाखात संजना संघीसोबत रोमान्स करताना दिसतोय आणि लाल रंगाच्या आकर्षक पोशाखात डान्स करताना दाखवले आहे.


    ‘सांसें देने आना’ हे मनाला भिडणारं गाण मनोज यादव यांनी लिहिल आहे आणि संवेदना राज बर्मन आणि पलक मुच्छाल यांनी गायली आहेत. झी स्टुडिओज आणि अहमद खान उपस्थित, ए पेपर डॉल एंटरटेनमेंट प्रोडक्शन, झी स्टुडिओज, शायरा खान आणि अहमद खान निर्मित, कपिल वर्मा दिग्दर्शित ‘राष्ट्र कवच ओम’. हा चित्रपट 1 जुलै 2022 ला रिलीज होणार आहे.