अभिनेता आणि करणी सेनेचा नेता सुरजित सिंग राठोडला मुंबई पोलिसांकडून अटक, मॉडेलचा विनयभंग केल्याचा आहे आरोप

एका मॅाडेलच्या तक्रारीवरुन मुंबईतील बंगूर नगर पोलिस ठाण्यात सुरजितसिंग राठोरे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला होता.

    मुंबई: करणी सेना नेते सुरजित सिंग राठोड (Surjit Singh rathore Arrest) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मॉडेलची विनयभंग आणि छळ केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. सुरजित सिंगने तिला सोशल मिडियावर फेक अकाऊंट बनवून तिला अश्लिल मेसेज  केल्याचाही आरोप त्या मॉडेलने केला आहे. तिच्या तक्रारीवरुन मुंबईतील बंगूर नगर पोलिस ठाण्यात सुरजितसिंग राठोरे यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. आयपीसीच्या कलम 354 (अ) (डी), 500,509,501,67 अंतर्गत सुरजितवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुशांतसिंह राजपूत प्ररकरणादरम्यान नावं आलं समोर

    सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही त्यांची अभिनेता सुरजित सिंग राठोडच्या नावाची खूप चर्चा झाली होती. सुशांतच्या मृत्यू नतंर त्याने रिया चक्रवर्ती कूपर हॉस्पिटलच्या शवगृहात नेल्याचा असा दावा सुरजित यांनी केला होता. तसेच सुरजित सिंहने मिडियासमोर सांगितले होते की, रिया जेव्हा रुग्णालयाच्या शवगृहात गेली तेव्हा तीने सुशांतच्या छातीवर हात ठेवून त्यांची माफी मागितली होती आणि रडत होती.

    अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचे सदस्य सुरजित सिंह राठौर यांनी सांगितले होते की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंह बबलू त्याच्या जवळचा आहे. त्याने सुशांत सिंगचा मित्र आणि निर्माता संदीप सिंगवरही गंभीर आरोप केले होते. सुरजीत म्हणाला होता, ‘संदीप सिंग या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. मी त्याला नीरजला येऊ द्या असे सांगितले.त्यावर त्याने मला विचारले की नाही. मी सुशांतचा मित्र आहे. माझ्याशी उद्धटपणे बोलला. तो रुग्णवाहिकेत सुशांतचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि सर्वांना दिशा देत होता. त्याची चौकशी झाली पाहिजे.याप्रकरणी मुंबई पोलीस आणि सीबीआयने संदीप सिंग यांचीही चौकशी केली होती.