‘परत जाऊ नका म्हणजे मिळवलं’, एकनाथ शिंदेंच्या ट्विटला अभिनेता आरोह वेलणकरचं उत्तर

प्रसिद्ध अभिनेता हेमंत ढोमेंचे (Hemant Dhome) एक ट्विटर खूप चर्चेत असताना, आता अभिनेता आरोह वेलणकरणं सुद्धा एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, खूप चर्चेत आहे. काल एकनाथ शिंदेंच्या ट्विटला अभिनेता आरोह वेलणकरचं (Aroh Welankar) अगदी मिश्किल उत्तर दिलं आहे. ‘परत जाऊ नका म्हणजे मिळवलं’, अशा प्रकारे ट्विट अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यानं केलं आहे, त्यामुळं या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार असून, मोठ्या प्रमाणात हे ट्विट व्हायरल होत आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणुकी (MLC Election 2022) भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकले. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. दरम्यान आता या सर्व घडामोडींवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

    दरम्यान, कालच्या नाट्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व जोक्सचा पाऊस (Social Media Mims and jokes) पडत आहे, या नाटमय घडामोडींवर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता हेमंत ढोमेंचे (Hemant Dhome) एक ट्विटर खूप चर्चेत असताना, आता अभिनेता आरोह वेलणकरणं सुद्धा एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, खूप चर्चेत आहे. काल एकनाथ शिंदेंच्या ट्विटला अभिनेता आरोह वेलणकरचं (Aroh Welankar) अगदी मिश्किल उत्तर दिलं आहे. परत जाऊ नका म्हणजे मिळवलं, अशा प्रकारे ट्विट अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यानं केलं आहे, त्यामुळं या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार असून, मोठ्या प्रमाणात हे ट्विट व्हायरल होत आहे.

    यापूर्वीचा भाजप व शिवसेनेचा अनुभव पाहता अभिनेता आरोह वेलणकरनं अगदी उपाहसात्मक ट्विट केलं आहे. शिवसेना व भाजपा वारंवार भांडून पुन्हा एकत्र येतात, यावर सगळेच कंटाळले आहेत, तुम्ही एवढे मोठे बंड केले आहे, म्हणून पुन्हा तुम्ही शिवसेनेत जाऊ नका असा रोख आरोहच्या ट्विटचा आहे, म्हणून त्यांना एक ओळ लिहली आहे. परत जाऊ नका म्हणजे मिळवलं असं गंमतीशीर व उपरोधिक ट्विट आरोहनं केलं आहे.