वडील इरफान खानच्या आठवणीत भावूक झाला बाबील, फोटो शेअर म्हणाला ‘मी कधीही हार मानणार नाही’

बाबिलने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तो त्याच्या वडिलांवर खूप प्रेम करतो आणि कधीही हार मानणार नाही.

  दिवंगत अभिनेते इरफान खानचा (Irfan Khan) मुलगा बाबिल खान (Babil Khan) आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखाच बॅालिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. इरफान खानचं 29 एप्रिल 2020 रोजी कर्करोगामुळे निधन झालं. त्याच्या वडिलांच्या चौथ्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी, बाबिल खानने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी भावनिक नोट शेअर केली आहे.

  बाबीलची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

  बाबिल खानने फोटो शेअर करत इरफान खानची आठवण काढली आहे. या चित्रांमध्ये दिवंगत अभिनेत्याच्या शेवटच्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या सेटवरील चित्राचाही समावेश आहे. ही छायाचित्रे पाहून इरफानच्या चाहत्यांना त्याची आठवण झाली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही मला योद्धा व्हायला शिकवले, पण प्रेम आणि दयाळूपणाने जगायलाही शिकवले. तुम्ही मला आशा बाळगायला आणि लोकांसाठी लढायला शिकवलं. तुमचे फक्त चाहते नाहीत, तुमचे एक कुटुंब आहे आणि मी तुम्हाला वचन देतो बाबा, जोपर्यंत तुम्ही मला बोलावले नाही तोपर्यंत मी आमच्या लोकांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी लढत राहीन. मी हार मानणार नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Babil (@babil.i.k)

  बाबिल खान हे बॉलिवूडमध्ये सातत्याने मोठे नाव बनत आहे. त्याच्या वडिलांप्रमाणेच तो त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने ‘काला’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. नुकताच तो ‘द रेल्वे मेन’मध्ये दिसला होता. लवकरच तो अमिताभ बच्चनसोबत शुजित सरकारच्या ‘द उमेश क्रॉनिकल्स’मध्ये दिसणार आहे.