अभिनेता भरत जाधव दिसणार ‘खलनायकाच्या’ भूमिकेत!

मराठमोळे अभिनेते भरत जाधव छोट्या पडद्यावर पुनरागम करून, ते एका मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

    मराठी अभिनेता भरत जाधव हे अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या पसंदीस आले आहे. आणि आपल्या अभिनयाने तसेच सुपरडुपर चिपत्रपट देऊन ते लोकांच्या घराघरात पोहचले आणि त्यांची मन जिंकली. त्यांनी आजवर मराठी चित्रपट करताना सुद्धा मराठी नाटकांवर सुद्धा भर दिला आहे. विनोदाच्या टायमिंगने रंगभूमी गाजवणारे भरत जाधव संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आहेत. भरत जाधव यांच्या कामाचे आणि अभिनयाचे अनेक चाहते आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतील, आता नुकतेच ते प्रेक्षकांना एका मराठी मालिकांच्या दरम्यान भेटीस येणार आहे. चाहत्यांसाठी हि आनंदाची बातमीच आहे.

    भरत जाधव हे झी मराठी वाहिनीवरील ‘पारु’ या मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर ‘पारु’ या मालिकेच्या प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये सूर्यकांत कदम या खलनायकाची एण्ट्री होणार असल्याचे दाखवण्यात आले होते. आता या खलनायकाची भूमिका अभिनेते भरत जाधव करणार हे स्पष्ट झाले आहे.

    मालिकेच्या प्रोमो
    भरत जाधव एका दमदार खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. पारु मालिकेच्या प्रोमो मध्ये तुम्ही सूर्यकांत कदमचा आकर्षक लुक पाहिला असेल. जितका खतरनाक लुक दाखवला आहे, तितकीच जबरदस्त भूमिका आहे. सूर्यकांत कदम अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करायला आला आहे असे त्या प्रोमोमध्ये दिसत आहे. तर दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने सगळयांना गावाकडच्या जीवनाचा आनंद घ्याव हे आहे. गावच्या वेशात पारू हि आदित्य आणि प्रीतमला तयार करते. आदित्य ही पारूला हरीषच्या प्रेमाचे दारं उघडायला सांगतोय. तसेच सूर्यकांत कदमने आपला पहिला डाव खेळला असून, त्याने श्रीकांतला गायब केले आहे. त्यातच अहिल्याला आपल्या घरावर असलेला धोका समजतो. अहिल्या समोर सूर्यकांत एक अट ठेवतो. काय आहे ती अट? अहिल्या समोर हे कोणतं नवं संकट येणार आहे? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

    अभिनेता भरत जाधव हा नुकताच ‘श्रीकांत’ या बॉलिवूड चित्रपटात न्याधिशाच्या भूमिकेत दिसला आहे. त्यांचा हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच भरत जाधव ‘हसताय ना? हसायला पाहिजे’ या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून कायम दिसत राहतात. आता त्यांची पारु या मालिकेत एण्ट्री झाली असून, भरत जाधव यांना मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.