chetan wadnere and rujuta dharap engagement

चेतनने अभिनेत्री ऋजुता धारप (Chetan Vadnere And Rujuta Dharap Engagement) हिच्यासह साखरपुडा उरकत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

    मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी विवाहबद्ध होत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. हार्दिक जोशी-अक्षया देवधर, आशय कुलकर्णी, सुमीत पुसावळे यांच्या विवाहाच्या बातम्या आपण सगळ्यांनीच वाचल्या असतील. काही दिवसांपूर्वीच अभिनेता संकेत पाठकचा साखरपुडा पार पडला. आता आणखी एका अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरेचा साखरपुडा झाला आहे. चेतनने अभिनेत्री ऋजुता धारप (Chetan Vadnere And Rujuta Dharap Engagement) हिच्यासह साखरपुडा उरकत नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.


    मित्रमैत्रिणी व कुटुंबियांच्या उपस्थितीत चेतन व ऋतुजाचा साखरपुडा पार पडला. चेतनच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत चेतनने शशांक ही मुख्य भूमिका साकारत आहे. ज्ञानदा रामतीर्थकरने यात अप्पूची भूमिका साकारली आहे. अप्पू आणि शशांकची ऑन स्क्रीन जोडी खूप लोकप्रिय आहे. शशांकने याआधी ‘फुलपाखरु’, ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकांमध्येही दिसला होता. तर ऋतुजाने ‘आई माझी काळुबाई’ मालिकेतून लोकांच्या मनाज जागा मिळवली.