सीआयडी फेम ‘इन्स्पेक्टर फ्रेडरिक’ची मृत्युशी झुंज ठरली अपयशी, अभिनेता दिनेश फडणीसांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधनं

CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून दिनेशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन (Dinesh Phadnis Died) झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज (5 डिसेंबर) त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

    मृत्युशी झुंज ठरली अपयशी

    दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये जीवन-मरणाची झुंज देत होते. काही दिवसापुर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.  दिनेश यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचा मित्र आणि सीआयडी शोमधील सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी दिली आहे. दयानंद शेट्टी दिनेश यांच्या खूप जवळचे होते. त्यांनाही दिनेश यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे.

    ‘CID’नं मिळवून दिली ओळख

    दिनेश फडणीस यांना छोट्या पडदा गाजवण्यासोबत रुपेरी पडदादेखील गाजवला आहे. त्यांनी 1993 मध्ये ‘फासले’ या शोच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘CID’ ही मालिकेतुन त्यांना मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेन त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारली जी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. या मालिकेच्या माध्यमातून 20 वर्षे त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. ‘सरफरोश’ या सिनेमाते आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले. त्यानंतर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या सिनेमात त्यांनी काम केलं. दिनेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.