chinmay mandlekar in alandi

सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता ‘ज्ञानेश्वर माउली’ ही मालिका प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या मालिकेच्या शुभारंभाचं औचित्य साधत अभिनेता व या मालिकेचा निर्माता चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar In Alandi) यांनी आळंदी येथे समाधीस्थ असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं.

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या(Dnyaneshwar Mauli) सव्वा सातशेव्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांची जीवनगाथा सोनी मराठी (Sony Marathi)वाहिनी घेऊन येत आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी सात वाजता ‘ज्ञानेश्वर माउली’ ही मालिका प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या मालिकेच्या शुभारंभाचं औचित्य साधत अभिनेता व या मालिकेचा निर्माता चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar In Alandi) यांनी आळंदी येथे समाधीस्थ असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. चिन्मयनं माउलींच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला.

    महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माऊलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. चिन्मयनं लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या साथीनं या मालिकेची निर्मिती केली आहे. रघुनंदन बर्वेसोबत तो या मालिकेचं दिग्दर्शनही करत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथासोबतच पसायदानासारखी विश्वप्रार्थना जगाला देणाऱ्या माऊलींनी रचलेला आध्यात्माचा भक्कम पाया या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.