आम्ही बंड केलं की आई कलथ्याने चटका द्यायची! अभिनेता हेमंत ढोमेंचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत

कालच्या नाट्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व जोक्सचा पाऊस (Social Media Mims and jokes) पडत आहे, अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही (Hemant Dhome) आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, खूप चर्चेत आहे.

    मुंबई : विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकले. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार स्पाइसजेटच्या विमानातून गुवाहाटीकडे रवाना झाले. दरम्यान आता या सर्व घडामोडींवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

    दरम्यान, कालच्या नाट्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व जोक्सचा पाऊस (Social Media Mims and jokes) पडत आहे, अशातच आता मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनंही (Hemant Dhome) आपल्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, खूप चर्चेत आहे. ‘आम्ही बंड केलं ती आई कलथ्याने चटका द्यायची. पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती, काय म्हणता?’ #बंड असं ट्विटमध्ये लिहलं आहे.

    हे ट्विट सध्या सोशल सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, खूप चर्चेत आहे. याला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून, यावर जोरदार रिप्लाय सुद्धा येत आहेत.