imran-khan-avantika-malik

गेल्या अनेक वर्षापासून इम्रान खान सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण त्याने सिनेसृष्टी का सोडली यावर आता एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.

  अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (imran khan) अनेक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. आमिर खानच्या कुटुंबासोबत जोडला गेलेला असूनही त्याला बॅालिवूडमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही. तो शेवटचा कंगना राणौतसोबत 2015 मध्ये आलेल्या ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॅाक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्याने आता नुकतचं एका मुलाखतीदरम्यान त्याने चित्रपटसृष्टी सोडण्याचे कारण सांगितले आहे. नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया.

  इम्रानने इंडस्ट्री का सोडली?

  जेव्हा इम्रानला विचारण्यात आले की, ‘कट्टी बट्टी’ फ्लॉप झाल्यामुळे त्याने फिल्म इंडस्ट्री सोडली होती का? यावर इम्रान म्हणाला की, ‘मी आजपासून इंडस्ट्री सोडणार आहे, असे त्यावेळी वाटले नव्हते. ते एका आठवड्यावरून एक महिन्यात बदलले आणि एक महिना वर्ष झाला. तेव्हा मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी इंडस्ट्री सोडेन कारण माझे मन त्यात नाही.’

  इम्रान पुढे म्हणाला, ‘चित्रपट उद्योगात प्रमोशन, पीआर आणि मॅनेजमेंटसह अभिनेत्यांभोवती संपूर्ण परिसंस्था असते. या वातावरणात सर्वांचे लक्ष फक्त पैसे कमवण्यावर आहे. चित्रपट, जाहिराती, देखावे आणि रिबन कटिंगसारख्या छोट्या समारंभातून कोण किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. या वातावरणाचा एक भाग असूनही, मला जाणवले की माझे चित्रपटांवरील प्रेम पैशापेक्षा कमी आहे.

  बॅालिवूडमध्ये कमबॅक करणार का?

  इम्रान खान मुलाखती दरम्यान आपल्या करिअरशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली. बॅालिवूड कमबॅक बद्दल उत्तर देताना इम्रान म्हणाला की, तो अजूनही चित्रपटांमध्ये परतण्याचा विचार करत आहे. त्याला आवडलेल्या काही गोष्टी मिळाल्या आहेत, परंतु असे कोणतेही काम अद्याप सापडले नाही जे तयार आहे.