
अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan) पत्नी अवंतिका मलिकपासून (Avantika Malik) विभक्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. इम्रानचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या विभक्त (Imran Khan Divorce) होण्यामागचं मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी सोहेल खान आणि सीमा खान घटस्फोट घेणार असल्याची बातमी आली होती. आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल आपले नाते संपवणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan) पत्नी अवंतिका मलिकपासून (Avantika Malik) विभक्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अवंतिकाने लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात तिला यश मिळालं नाही. इम्रान आणि अवंतिका यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१४ मध्ये यांना मुलगी झाली. इमारा असं या दोघांच्या मुलीचं नाव आहे.
या दोघांनी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज केला नसल्याने घटस्फोटाची (Divorce) कायदेशीर प्रक्रिया सुरु झालेली नाही. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे दोघं वेगळे राहत होते.
View this post on Instagram
इम्रानचे विवाहबाह्य संबंध हे दोघांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण असल्याची चर्चा आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन हिच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं.
इम्रानने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, ‘डेल्ली बेली’, ‘गोरी तेरे प्यार में’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘कट्टी बट्टी’ हा त्याचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये त्याने अभिनेत्री कंगना रनौतसोबत काम केलं होतं. मात्र त्यानंतर तो चित्रपटात झळकला नाही.