अभिनेता करणवीर बोहरावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, पोलीस लवकरच त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवणार आहेत.

    मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. टिव्हीवरील पॅापुलर चेहरा अभिनेता​करणवीर बोहरा (karanvir Bohra ) याच्यासह ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेकडून 1 कोटी 99 लाख रुपये घेतल्याचा त्याच्यवर आरोप आहे.

    2019 मध्ये अभिनेता महेंद्र कुमार बोहराचा ‘हमे तुमसे प्यार कितना’ हा चित्रपट आला. तेव्हा बोहराने एका महिलेकडून 35 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरटीजीएसद्वारे 1 कोटी 64 लाख रुपयेही घेतले, असा दावा महिला तक्रारदाराने केला आहे. पैसे घेताना बोहराने अडीच टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी दिली. त्यामुळे महिलेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यासाठी आरोपीने आपल्या फ्लॅटचे कागदपत्राची एक झेरॉक्स प्रत महिलेला दिली. एक कोटी केले परत – बोहरा यांनी एक कोटीहून अधिक रक्कम परत केली आहे. मात्र, उर्वरित रक्कम देत नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. आम्ही बोहरा यांच्याशी बोललो असता त्यानी योग्य प्रतिसाद दिला नाही आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, पोलीस लवकरच त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवतील.