अभिनेता क्षितीज झारापकर यांचं निधन, वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अनेक दिवसापासून होते आजारी

अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांनी वयाच्या 54 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

    मनोरंजन सृष्टीतून एक  दुख:द बातमी समोर येत आहे.अभिनेता, लेखक दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या कॅन्सरमुळे त्यांची प्राणज्योत मालावली. एकुलती एक, आयडियाची कल्पना या सारख्या चित्रपटांमधून त्यांंनी प्रेक्षकाचं मनोरंजन केलं होतं. त्यांच्या निधनानंं मरठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

    रिपोर्टनुसार, क्षितीज यांना कर्करोगाचं निदान झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यांपासून ते आजाराशी लढत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारा त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील.

    क्षितीज झारापकर हे उत्तम अभिनेता असण्यासोबतच, एक उत्तम लेखक आणि  दिग्दर्शकही होते. ते गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.