mandar jadhav

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत कबड्डी प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला. (Mandar Jadhav Hangs On A Tree)अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवनं(Mandar Jadhav) बरीच मेहनत घेतली.

    स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत लवकरच कबड्डीचा सामना(Kabaddi Match In Sukh Mhanje Nakki Kay Asta) देखील रंगणार आहे. शालिनीनं शिर्केपाटील कुटुंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवायची तर तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल, अशी अट असल्यामुळं आता जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटुंबानं कंबर कसली आहे.

    कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा. कबड्डी प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा टांगला गेला. अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधवनं बरीच मेहनत घेतली. चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड तर होतंच आणि तितकंच जबाबदारीचं देखील. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सूचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्यानं मंदारनं हा अवघड सीन पूर्ण केला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान स्वीकारल्याचं त्यानं सांगितलं. हा प्रसंग कायम लक्षात राहील असंही तो म्हणाला. ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेतला कबड्डीचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता नक्कीच आहे.