mithilesh chaturvedi

ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे लखनऊमध्ये निधन झाले आहे. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

    लखनऊ: ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांचे लखनऊमध्ये निधन झाले आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) मिथिलेश चतुर्वेदी यांनी अखेरचा (Mithilesh Chaturvedi passed Away) श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून मिथिलेश ह्रदयासंबंधित आजारावर उपचार घेत होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी ते त्यांच्या मूळगावी लखनऊला स्थायिक झाले होते. मात्र काल ३ ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी त्यांनी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

    आशिष चतुर्वेदी यांनी फेसबुकवर मिथिलेश यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं आहे की, “तुम्ही जगातील सगळ्यात उत्तम पिता होता. तुम्ही मला जावई म्हणून नाही तर मुलाप्रमाणे प्रेम दिले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.”

    मिथिलेश चतुर्वेदींच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतीन अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.