स्टाईल फेम अभिनेता साहिल खान दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, 47 वर्षाच्या साहिलनं 21 वर्षीय तरुणीसोबत बांधली लग्नगाठ!

स्टाईल फेम अभिनेता साहिल खानने दुसंर लग्न केलं आहे. साहीलने 21 वर्षाच्या मॅाडेलसोबत विदेशात लग्नगाठ बांधली.

  2001 मध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारा अभिनेता साहिल खान (Sahil Khan) आता बॉलिवूडपासून दूर गेला असेल, मात्र आपल्या फिटनेससाठी तो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. काही दिवसापुर्वी त्याचं नाव ‘महादेव’ बेटिंग ॲपमध्ये आलं होतं. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साहिलनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. 47 वर्षीय साहिलनं 21 वर्षीय मुलीसोबत लग्न (Sahil Khan Second Marriage) केलं आहे.

  साहिल खानने विदेशी सुंदरीशी केलं लग्न

  साहिलनं नुकताचं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आणि त्याच्या चाहत्यांना सांगितले की त्याने त्याच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. या व्हिडिओमध्ये साहिल खान त्याच्या दुसऱ्या पत्नीची ओळख करून देताना म्हणतो, “माझी सुंदर पत्नी”. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की साहिल खान आणि त्याची परदेशी पत्नी गोल्फ कार्टमध्ये समुद्राच्या मध्यभागी कसे बसले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sahil Khan (@sahilkhan)

  आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी साहिल खानने आपल्या पत्नीसोबत तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला, जिथून त्याने त्याच्या सोशल मीडियावर काही झलक शेअर केली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sahil Khan (@sahilkhan)