sanjay patil

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याचा नुकताच साखरपुडा(Actor Sanjay Patil Engagement) झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीप यांची अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मालिकेत उदय शिर्के पाटील(Uday Shirke Patil) ही भूमिका साकारणारा अभिनेता संजय पाटील याचा नुकताच साखरपुडा(Actor Sanjay Patil Engagement) झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sanjay Patil (SP) (@sanjaysharada09)

    अभिनेता संजय पाटील याने इन्स्टाग्रामवर होणाऱ्या पत्नीसोबतचे फोटो पोस्ट करत सर्व चाहत्यांना साखरपुड्याविषयी सांगितले आहे. अबोली गोखले असे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू,” असे कॅप्शन देत त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sanjay Patil (SP) (@sanjaysharada09)

    संजय आणि अबोलीचा साखरपुडा हा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला. “आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही,” असेही त्याने हे फोटो शेअर करताना म्हटले आहे. अबोली ही एक वेलनेस ब्लॉगर आहे. तसेच ती पोषणतज्ञ, योग सल्लागारही आहे.