shahrukh khan honoured in red sea film festival

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (Red Sea International Film Festival 2022) हा सौदी अरेबियात १ ते १० डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. जगभरातील अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील.

    अभिनेता शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण झालीआहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही शाहरुख खान लोकप्रिय आहे. ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Red Sea IFF) शाहरुखचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (Red Sea International Film Festival 2022) हा सौदी अरेबियात १ ते १० डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. जगभरातील अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याची सिनेप्रेमींसह सेलिब्रिटींमध्येदेखील क्रेझ आहे. तसेच ४१ भाषेतील ६१ देशांच्या १३१ फीचर आणि शॉर्ट फिल्मचं या पुरस्कार सोहळ्यात स्क्रीनिंग होणार आहे.

    सिनेसृष्टीतल्या योगदानासाठी ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये शाहरुख खानला सन्मानित करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील शाहरुखच्या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. मनोरंजन क्षेत्रात तो ४ दशकाहून जास्त काळ कार्यरत आहे.  आजवर त्याने १०० हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

    जागतिक सुपरस्टार आणि एक उत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आज शाहरुख खान सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे आता डिसेंबरमध्ये त्याला भेटण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे, अशी भावना रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणही शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. याशिवाय ‘जवान’ चित्रपटाचं कामही सुरु आहे.