विक्रम गोखले यांच्या जाण्याने आम्ही कलाकार पोरके झालो – शरद पोंक्षे

विक्रम गोखले यांच्या जाण्याने मोठं नुकसान मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचं झालं आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदुस्तानच्या सर्वच भाषांच्या चित्रपट सृष्टीचे झाले आहे. हिंदुस्तानच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये त्यांनी काम केली आहेत. विक्रम काकाकडे अत्यंत देखणा अभिनय आणि त्याच देखण आणि तेजस्वी स्वरूप असं त्यांच जबरदस्त कॉम्बिनेशन होत.

    मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वस्थरातून हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम गोखले यांचे जवळचे सहकारी आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी गोखले यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. विक्रम गोखले यांच्या जाण्याने आम्ही कलाकार पोरके झालो, अशी भावना शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.

    अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “आमच्या अख्या पिढीला विक्रम गोखले यांनी अभिनय शिकवला. स्टेजवर कसं वावरावं, कसं बघावं, कसं बोलावं दोन शब्दांच्या मध्ये गॅप कशी असावी, कलाकाराने ऑफ द स्टेजऑन द स्टेज कसं रहावं इथपासून विक्रम काकाने आम्हा कलाकारांना शिकवल. इतका सुसंस्कृत आणि वैभवशाली कलाकार असलेला आमचा तो गुरु होता. मी त्याला विक्रम काका म्हणायचो”.

    पुढे ते म्हणाले, “विक्रम काका हा अत्यंत सुसंस्कृत राष्ट्रनिष्ठ आणि राष्ट्रावर प्रेम करणारा होता. ज्याप्रकारे त्याचे वडील चंद्रकांत गोखलेंनी सैनिकांना मदत केली तीच परंपरा विक्रम गोखले यांनी शेवट पर्यंत सुरु ठेवली. विक्रम गोखले यांच्या जाण्याने मोठं नुकसान मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचं झालं आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदुस्तानच्या सर्वच भाषांच्या चित्रपट सृष्टीचे झाले आहे. हिंदुस्तानच्या जवळपास सर्वच भाषांमध्ये त्यांनी काम केली आहेत. विक्रम काकाकडे अत्यंत देखणा अभिनय आणि त्याच देखण आणि तेजस्वी स्वरूप असं त्यांच जबरदस्त कॉम्बिनेशन होत. विक्रम गोखले यांच्या जाण्याने आम्ही कलाकार पोरके झालो” अशी भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.